नांदेड : राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दरवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने अर्ज भरता येणार आहेत. परंतु, त्यासाठी ऑनलाईन अर्जात अर्ज करणाऱ्या प्रशिक्षक, संस्था अथवा खेळाडुस आपल्या कामगिरीची तपशिलवार माहिती संबंधीत विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करणे बंधनकारक आहे.
राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दरवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिला जातो. राज्यात शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडु) असे विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी नेमका अर्ज कसा करावा या बद्दल ‘इ-सकाळ’च्या माध्यमातुन आपणास विशेष माहिती देणार आहोत.
काय आहेत निकष
संबंधितानी ऑनलाईन अर्जात आपल्या कामगिरीच्या तपशिलासह www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज व संबंधित माहिती सादर करावी. ऑनलाईन भरलेल्या आर्जाची एक प्रत स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रासह अर्जदाराने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात पाच फेब्रुवारी २०२० पर्यंत सादर करावे. ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करण्यात आलेल्या कागदपत्राशिवाय इतर कोणतेही अधिकची कागदपत्रे अर्जासोबत जोडू नये. ऑनलाईन व्यतिरीक्त इतर कागदपत्रे जोडलेली असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कागदपत्रांचा गुणांकनासाठी विचार केला जाणार नाही. धिक माहिती, पात्रतेचे निकष व नियमावली आदी माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर २४ जानेवारी २०२० चा शासन निर्णय बघावा.
हेही वाचलेच पाहिजे- नांदेड जिल्ह्यातील या २६ गावात रंगणार ‘जल पे चर्चा’
असे आहेत पुरस्कार-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य पुरस्कार (संघटक - कार्यकर्ते), जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला संघटक - कार्यकर्ते व महिला क्रीडा मार्गदर्शक), राज्य क्रीडा साहिसी पुरस्कर, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडु), एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडु, शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार असे एकुण आठ पुरस्कार दिले जाणार आहेत.
ज्येष्ठ खेळाडूंसाठीही पुरस्कार
ज्येष्ठ क्रीडापटु, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक/ कार्यकर्ते व क्रीडा क्षेत्राशी सबंधित अशा ६० वर्षावरील व्यक्तींनाही ज्येष्ठ क्रीडा महर्षीचा गौरव करण्याचा दृष्टीने शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. ज्येष्ठ क्रीडा महर्षीची माहिती नामांकनाद्वारे केंद्र शासनाचे पुरस्कारार्थी (महाराष्ट्रामधील) यांची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी, विभागीय उपसंचालक हे संचालनालयास सादर करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.